आषाढी एकादशी … मनातली

By

रिमझीम पाऊस.. रत्नागिरीतल्या विठोबाच्या देवळाचं ओलसर झालेलं दगडी प्रांगण.. देवळातले नामदेव,तुकोबा आणि ज्ञानोबांचे पुतळे.. लाऊडस्पीकरवर भीमसेन अण्णांचे अभंग. . भक्तांची लगबग.. तुळशीमाळा आणि फुलं.. रांगेत उभं राहून घेतलेलं दर्शन.. कमरेवर हात घेतलेलं ते दैवत .. आणि नाकापासून कपाळापर्यंत टिळा लावून धन्य होऊन मंदिरातून निघालेले मी आणि दादा देशमुख… तीर्थ विठ्ठल क्षेत्रं विठ्ठल..! तो मृदंग आणि टाळ..!

मनाच्या कॅनव्हासवर आषाढी एकादशीचं हेच चित्रं असणार आहे.. युगं अठ्ठावीस !!

//केदार//

Posted In ,