हल्ली नव्या ताज्या दमाचे कलावंत फार तयारीचे आहेत. आपल्या मनातील कल्पनांना छेद देणारे कलाकार आहेत हे.
पूरबायन चॅटर्जी, अनुपमा भागवत, रूपा पानेसर – सतार ( पूरबायनचा यमन आणि बागेश्री, अनुपमाजींचा बिहाग आणि रूपा चा मालकंस यू ट्यूबवर आहेत. बहारदार वाजवले आहेत. यात पूरबायन तर मध्ये स्वतः सरगम गातो. )
तन्मय देवचके – हार्मोनियम ( अप्पा जळगांवकर, मनोहर चिमोटे, सचिन जांभेकर यांच्या तोडीचा कलावंत)
ओजस अढिया – तबला
प्रतिभा बघेल – गझल ( जगजितजी, मेहदीहसन साहेब यांच्या बरोबरीची )
पारसनाथ – बासरी
रागिणी आणि नंदिनी शंकर – व्हायोलिन ( आजी एन राजम्, आई संगीता शंकर यांची लेगसी असूनही स्वतंत्र प्रगल्भता)
सांगितिक इतिहासातील जे कलाकार आहेत त्यांच्या तोडीचे हे सर्व आहेत यात संदेह नाही. मी जाणून राहुल देशपांडे हे नांव घेतलं नाही कारण दुसऱ्या कलाकारांची प्रसिध्द गाणी स्वतः म्हणून दाखवणारे ऑर्केस्ट्रा टाईप गायक बाजारात उदंड प्रमाणात असताना अंगची बावन्नकशी कला हा कलाकार .. जाऊदे. !!
Happy listening 🎼
//केदार//