प्रभाताई अत्रे 🎼..।।

By

प्रभाताई, ‘तन मन धन तो पे वारू’ म्हणजेच ‘कलावती’ आणि ‘जागू मै सारी रैना बलमा, रसिया मन लागेना मोरा’ म्हणजेच ‘मारूबिहाग’ हे माझ्या हातांनी ‘अ ब क ड इ’ लिहायला शिकायच्या आधी माझ्या कानांवर तुमचे सूर ऐकून पक्के झाले होते.

नंतर ‘सवाई’ मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष ऐकलेल्या अनेक बहारदार आठवणी आहेत.

त्या ‘वरच्या’ला बहुतेक अभिजात दर्जेदार लाईव्ह संगीत ऐकायची आस लागली असावी.

म्हणून परवा राशिद भाई आणि आज तुम्ही.

तुमच्या ऐकलेल्या अनेक मैफिली आणि तुमचा दैवी स्वर कानात.. आठवणी मनात आणि अश्रू डोळ्यांत .. असा मी, या क्षणीचा !

तुमचा ऋणी,

//केदार//

Posted In ,