पितृपक्षातले श्राध्द आज घरी केले. यासाठी ज्या पूर्वजांचं स्मरण करून ज्यांचे श्राध्द करायचे असते त्या पूर्वजांच्या नावाची यादी आमचे परचुरे गुरूजी करत बसले होते.
आजोबा, पणजोबा, आजी वगैरे जे कुणी गेले त्यांची नावं,गोत्रं मी जे सांगेन त्याप्रमाणे गुरूजी लिहून घेत होते. यादी झाल्यावर कागद पेन बाजूला ठेवत गुरूजींनी मला विचारलं, ‘तुमचं वय काय?’
गुरूजींचा प्रश्न नॉर्मल होता पण विचारायची वेळ चुकली होती. मी म्हणालो, ‘त्रेपन्न, वेळ आहे अहो अजून माझं नांव यादीत लिहायला’ तुम्ही कार्य सुरू करा’.
हास्याचा घरभर स्फोट!!
//केदार//
27/09/2024