मस्त मराठी !!

By

याआधीच्या लेखामध्ये मी ‘ळ’ या मराठी मूळाक्षराची जोड असलेल्या मराठीमधल्या दोन अक्षरी शब्दांची गंमत लिहिली होती. नंतर विचार करता एक जोडाक्षर समोर आलं की ज्या जोडाक्षराने अथवा त्याच्या बाराखडीने मराठीमध्ये कित्येक अर्थपूर्ण शब्द आहेत. ते जोडाक्षर म्हणजे ‘स्त’.

अस्त, व्यस्त, फस्त, शिस्त, भिस्त, तस्त, गस्त, कुस्ती, खस्ता, मस्त, जस्त, जास्त,दस्त,नस्ती, पुस्ती, बस्ता, रस्ता, सुस्त, हस्त, स्वस्त, रास्त …

आपल्या मराठीमध्ये जशी प्रत्येक अक्षराची बाराखडी आहे तशीच ती जोडाक्षरांचीसुद्धा करता येते जसं की ‘स्त स्ता स्तु स्तू’ इत्यादी.

डोळे दिपवणारे मराठी भाषेचे वैभव ते हेच, नाही का ?

( माझ्याकडून वर अजूनही काही शब्दांचा उल्लेख राहून गेला असेल तर कृपया भर घालावी)

//केदार//

13/10/2024

Posted In ,