होय, बरं गातो हा ! आवाजाची फिरत चांगली आहे. घराण्यातून आलेला संगीताचा वारसा त्यात मराठी नाट्यसंगीत व शास्त्रीय संगीतही खूप छान पेश केलं जाते.
पण.. मराठी गाणं झालं की मध्ये याचं इंग्लीश भाषेतच बोलणं हे खूप आचरटासारखं वाटतं. ही एक अभिजात दर्जाची संगीत मैफिल नं वाटता गणपतीच्या मांडवातलं विविध गुणदर्शन वाटू लागतं.
इतर कुठे इंग्रजी झाडण्याची संधी मिळत नसावी म्हणून आमच्यासारखे श्रोते याच्ं गाणं ऐकताना आमच्यावरच हा विंग्रजी फेकतो ? कै च्या कैच , नै का ?
बघा .. यू ट्यूबवरचे एकजात सगळे व्हिडियो बघा.
प्लीज लिसन माय ओल्ड मराठी सिंगिंग ..!
(इंग्लीशच फाडत बसतंय च्यामारी)
//केदार//
31/10/2024