काही वेळापूर्वी व्हॉट्सॲपवर एक विनोद आला ज्यामध्ये ‘वि’ या अक्षरावरून सुरू होणाऱ्या एकदोन शब्दांवरून विनोद प्रकट झाला होता. हसू आले, पण तेव्हा आपल्या माय मराठीची शब्दसंपदा किती श्रीमंत आहे हे लक्षात आलं.
कुठल्याही अक्षराची बाराखडी हे आपल्या भाषेचं वैशिष्ट्य आहे आणि यामुळेच आपल्या शब्दसंपत्तीमधे विपुलता येते. इंग्रजीमध्ये पहा फक्त २६ अक्षरं आहेत आणि त्यांच्या permutations आणि combinations मुळे शब्दांची निर्मिती झाली आहे. जरी त्या शब्दाना अर्थ प्राप्त झाला असला तरी आपल्या मायमराठीतल्या कानामात्रा अकार उकार वेलांट्या यांच्यामुळे निर्माण झालेल्या बाराखड्या यांचे भाषावैभव शब्दातीत आहे.
एखाद्या अक्षरामुळे उत्पन्न होणारा शब्द आणि त्याचा गर्भितार्थ हा एक वेगळाच नाद तयार करून जातो. आताचं उदाहरण म्हणजे ‘वि’ हा शब्द ! या एका ‘वि’ पासून सुरू होणारे किती शब्द असतील याचा विचार करू लागलो आणि थक्क झालो.
विचार, विशेष, विपुल , विनोद , विनायक , विकृत , विशुद्ध, विकार, विवाह, विझवणे, विंचरणे , विंचू , विस्तार , विशाखा , विरळ , विस्तव , विनिमय , विनियोग , विश्व , विचित्र , विप्लव , विभव , वीर , वीरगळ , विशिष्ट , विपरित , विनाश , विक्रम , विश्वास , विरोध , विरेचन , विश्लेषण , विशाल , विमान , विराट , विकास , विरचित, विराम, विभ्रम , विस्तीर्ण , विश्राम , विश्रांती, विनाशिका , विस्तृत , विविध, विळी , विलास , विलाप , विश्वनाथ , विधायक, विपश्यना , विचारवंत , विषय , विहिण , विहीर, विहार , विधान , विराणी , विषम, वीष, विधाता, विधीलिखीत, विघ्न, विघातक , विक्री , विकट ,विस्मृति ,विरूद्ध, विरक्त, विदग्ध, विकसनशील, विडी, विडा, विळा, विसावा, विनय, विनम्र, विनंती, विदारक, विवाद, विसंवाद, विस्फोटक, विराण, विटी, विट, वीणा, वीज, विजेरी , विद्युत, विश्वकोष , विख्यात , विडंबन, विटंबना , विकासक., विरूपाक्ष , विश्वकर्मा, विश्वरूप , विरजण , विमर्श , विषृववृत्त, विदा, विद्या, विद्यार्थी, विकलांग, विजय, विखार, विखुरणे, विक्षिप्त, विवक्षित, विदीर्ण, विकोप, विलोल, विलोम, विधवा, विधुर, विमा, विमोचन, विन्मुख, विक्रेता, विकेशा, विनित, विदारक., विवस्त्र, विषण्ण, विदुषक, विश्रब्ध..!
बापरे .. अजून अनेक शब्द राहिले आहेत. कृपया सुचवावेत. पण इंग्रजीला जर वाघिणीचे दुध म्हणत असतील तर आपली मायमराठी अस्सल वाघिण आहे यात दुमत नसावे.
असा हा विशिष्ट ‘वि’ ..!
बरोबर ना ?
//केदार//
04 Feb 2025
ता.क.
आमच्या अरूण ने ‘भुसनळ्या हे कसे विसरलास ‘? असं म्हणून पुढील शब्द वरच्या यादीत सुचवले.
विलसणे, विसरणे, विचलित, विमनस्क , वितंडवाद, विकल्प, विधी , विधिवत – धन्यवाद अरूण 🙏
माझा मित्र विकास मुळ्ये याने पुढील शब्दांची भर घातली – विभा, विस्मयकारक, विविधरंगी,विओम,विरा,विहित, विविधा, विलोप, विवाद,विवादित, विंध,विंध्य,,विरह,विराज🙏
संतोष जळके माझा मित्र याने पुढील शब्द सुचवले – विश्वस्त, विजार. विजनवास, विज्ञान, विध्वंस. 🙏
परममित्र संजय तिरोडकर याने पुढील शब्द सुचवले – वित्त, विर्य, विस्कळीत,विपक्ष, विमल 🙏
पत्रकार मित्र सोमनाथ रूणकर याने पुढील शब्दांची भर घातली –
वितंडवाद विद्रोही विवेक विकासक विध्वंसक विमोचन विरक्ती
🙏